शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:52 IST

दोन सैराट जोडप्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यातील दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारवरून दोन्ही तरुणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यातील दोन सैराट जोडप्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यातील दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारवरून दोन्ही तरुणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील बामणी येथील संशयित रामा देवरे याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीस सात मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून फूस पळूवन नेले. विशेष म्हणजे या तरुणीचा १२ मे रोजी विवाह ठरला होता. तर दुसरे सैराट जोडपे हे परतूर शहरातील आहे. पारधीवाडा येथील संशयित आशोक चव्हाण यानेही सात मे रोजी एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळूवन नेले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीस आठवडाभरापासून त्यांचा शोध घेत होते. सोमवारी दोन्ही जोडप्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन परतूर पोलीस ठाण्यात आणले. मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही संशयित तरुणांवर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तर मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक नंदकुमार अंतराप हे करीत आहेत.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस