शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘नायजेरीनयन फ्रॉड’ करणारे दोघे गजाआड, ओएलएक्सवर फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:55 IST

ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

जालना : ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

मुरसलीम फजरू खान (२३,रा.घोघोर, भरतपूर, राजस्थान) व सद्दाम खान कासू खान (२३,झेंजपुरी, भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जालना पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी अभिषेक शिरगुळे याने ओ.एल.एक्स या संकेतस्थळावर आयफोन खरेदी केला होता. मोबाईल विक्री करणा-यास त्यांनी पेटीएमद्वारे साडेबारा हजार रुपये दिले होते. विक्री करणा-याने शिरगुळे यांच्याशी ओळख करून त्यांचे शासकीय ओळखपत्र व आधारकार्ड व्हॉटअ‍ॅपवर मागवून घेतले. पैसे देवूनही मोबाईल मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क केला असता, त्याने मोबाईल पाठविल्याचे सांगितले. शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्या आधारे ओएलएक्सवर बनावट जाहिरात दिली. त्यामुळे शिरगुळे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वस्तू मिळाली नसल्याबाबत फोन आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार सायबर सेल तथा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सांगितला. तसेच सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात संशयितांची सर्व माहिती मिळविल्यानंतर शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्याआधारे इतरांची फसवणूक झाल्याचे समोर आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावी सायबर सेलचे पथक पाठविण्यात आले. मात्र, संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर पथकाने झेंजपुरी येथे काही दिवस थांबवून खब-यांमार्फत संशयितांची माहिती मिळवली.   पाच फेबु्रवारीला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून जालन्यात आणले. चौकशीत त्यांनी अशाच पद्धतीने इतर राज्यातही अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, दहा सीमकार्ड जप्त केले आहेत.न्यायालयाने त्यांना  १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सायबर सेलेचे प्रभारी अधिकारी बी.डी. बोरसे, हेड काँस्टेबल भालचंद्र गिरी, लक्ष्मिकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश गोफणे, शिवप्रसाद एखंडे, शेख इरफान शेख, योगशे सहाणे, संगीता चव्हाण, अर्चना आधे यांनी ही कारवाई केली.

नायजेरियन अधिक सक्रीय

पोलीस रेकार्डनुसार अशा पद्धतीने आॅनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार नायजेरियासह इराणी हकर्सकडून मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची फसवणूक नायजेरियन फ्रॉड म्हटले जाते, असे पोलीस निरीक्षक गौर यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाCrimeगुन्हा