शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगी तालुक्यात तीन दिवसांपासून बावीस गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:22 IST

Jalana News तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका

रांजणी : रविवारी सकाळी पोलवर वीज पडल्याने घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह २२  गावे मागील तीन दिवसांपासून अंधारात आहेत. तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. 

रांजणी व परिसरात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर-रांजणी वीज वाहिनीवरील पोलवर वीज पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुपारी पाऊस कमी झाल्याने महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती करण्यास सुरूवात केली. परंतु, सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रविवारी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु, तीन तासातच पुन्हा बिघाड झाली. अनेकवेळा कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. 

मागील तीन दिवसांपासून रांजणी केंद्रासह बोररांजणी, करडगाव, चित्रवडगाव, माहेरजवळा, कंदारी या उपकेंद्राअंतर्गत येणारी २० ते २२ गावे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजंणी केंद्राचे सहायक अभियंता ए. एम. म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ ए. एम. जईद, एच. टी. टेंबरे, एल. डी. पठाडे, एस. बी. पाटोळे, व्ही. आर. शिंदे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

तातडीने दुरूस्ती करण्याची मागणीविद्युत पुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने मोबाईल बंद पडले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दीपक उघडे, लक्ष्मण पाटोळे, अंबादास मोरे आदींनी केली आहे.  

टॅग्स :Jalanaजालनाelectricityवीज