शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:03 IST

वडीगोद्री : चालकास मारहाण करत हातपाय बांधून ऊसाच्या शेतात फेकून देत १९ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक पळवून नेल्याची ...

वडीगोद्री : चालकास मारहाण करत हातपाय बांधून ऊसाच्या शेतात फेकून देत १९ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उद्धव साहेबराव पाळवदे (३९, रा.सासोरा,ता.केज,जि.बीड) असे हायवा चालक व मालकाचे नाव आहे. पाळवदे यांचा हावया ट्रक (एमएच.४८,टी ६३६९) आयआरबी कंपनीचे गुत्तेदार गुरुदत्त अडसूळ यांच्या वडीगोद्री परिसरातील साईटवर सुरू होता. दिवसभर काम केल्यानंतर रविवारी रात्री त्यांनी वडीगोद्री येथील वैष्णवी ढाब्यासमोर हायवा उभा केला आणि केबिनमध्येच झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास एका संशयितांने ट्रकच्या केबिनचा दरवाजा वाजला. जाग आल्यामुळे पाळवदे यांनी काच खाली करून विचारले असता, बाहेर उभ्या व्यक्तीने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी देण्यासाठी केबिनचा दरवाजा उघडताच खाली उभा असलेली व्यक्ती केबिनमध्ये चढली. दुसºया बाजूने आणखी दोघेजण आत आले. त्यांनी उद्धव पाळवदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवे मारण्याच्या धमक्या देत खाली दाबून ठेवले. स्टेअरिंंगला अडकविलेल्या चाबीने ट्रक सुरू करून ते भरधाव बीडच्या दिशेने निघाले. ट्रकचे लाईट लागत नसल्याने त्यांनी मारहाण करून लाईट सुरू करण्यास सांगितले. अर्धा तास गाडी चालविल्यानंतर अंधारात गाडी थांबवून पाळवदे यांना खाली उतरवले. जिवे मारण्याची धमकी देत हातपाय बांधून रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात नेऊन टाकले. घाबरलेल्या पाळवदे यांनी तासाभरात स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत, पहाटे साडेतीनच्या सुमारास बाजूची वस्ती गाठली. वस्तीवरील काही नागरिकांना घडला प्रकार सांगितला. स्थानिकांनी हा झिरपीतांडा असल्याचे सांगून पाळवदे यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी पत्नीशी संपर्क करून घडला प्रकार सांगितला.या प्रकरणी उद्धव पाळवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करीत आहेत.------------आठवडाभरापूर्वीच खरेदीउद्धव पाळवदे यांनी २३ जानेवारीला बोरवली येथील तेजपाल जोशी यांच्याकडून १८ लाख ६७ लाखाला हायवा ट्रक खरेदी केला होता. १४ लाख ६७ हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देण्याचा करार केला होता. घरी ट्रकची पूजा केल्यानंतर त्यांनी २४ जानेवारीला काम सुरू केले होते. चार दिवसांनंतर हा ट्रक संशयितांनी पळवून नेला.