लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथे सुरू असलेल्या जालना महोत्सवात रविवारी घेण्यात आलेल्या श्रीमती जालना स्पर्धेत जालन्यातीलच तृप्ती सैनी या श्रीमती जालना ठरल्या़रविवार (दि़ २०) श्रीमती जालना ही स्पर्धा खुल्या रंगमंचावर घेण्यात आली़ या स्पर्धेत एकूण आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ श्रीमती जालना हा बहुमान तृप्ती सैनी यांनी पटकाविला़ या शिवाय बेस्ट स्माईल हा पुरस्कारही त्यांनीच पटकाविला़ या स्पर्धेत ़ अपर्णा बनसोडे यांनी द्वितीय क्रमांक तर रुपाली क्षीरसागर यांनी तृतीय क्रमांक पटकविला़ ़ अंजली घायाळ यांनी बेस्ट पर्सनॅलिटी हा पुरस्कार पटकाविला़ या स्पधेर्चे परीक्षक म्हणून मयूरेश अभ्यंकर तसेच स्मिता अष्टेकर यांनी काम पाहिले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ़ नीता जैन व निकीता मांजरमकर यांनी केले़ श्रीमती जालना स्पधेर्तील विजेत्यांना जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर, सीमा अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली़ यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, वीरेंद्रप्रकाश धोका, भावेश पटेल, बंडूभाऊ मिश्रीकोटकर आदींची उपस्थिती होती.
तृप्ती सैनी ठरल्या श्रीमती जालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:25 IST