आंदोलनाला पाठिंबा
अंकुशनगर : साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. विलास बापू खरात, सुरेश धस यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण मिळावे, यासाठी सभागृहात आवाज उठवू, असेही धस यांनी सांगितले.
अग्रवाल महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ
जालना : येथील अग्रवाल महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मावळत्या अध्यक्ष सरिता बगडिया यांनी नूतन अध्यक्ष शोभा देविदान यांच्याकडे पदभार सोपविला. या प्रसंगी शोभा देविदान, अनिता देविदान, शोभा पंच, स्मिता देविदान, अनिता तवरावाला, ज्योती अग्रवाल, सरिता बगडिया यांची उपस्थिती होती. गुणवंत महिला ममता मल्लावत, श्रद्धा देविदान, रक्षा तवरावाला यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर, उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांची उपस्थिती होती.
आष्टी परिसरात उसाचे क्षेत्र वाढले
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात डावा कालवा व गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. असे असले, तरी पुढे कारखान्यास गाळपसाठी उस जातो की, नाही याचीही मोठी धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. यंदा खरीप हंगामात झालेले नुकसान ऊसातून भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
कोषाध्यक्षपदी बंडू गायकवाड यांची निवड
अंबड : जिल्हा महसूल कास्ट्राईब संघटनेच्या कोषाध्यक्षपदी येथील तहसील कार्यालयातील बंडू गायकवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गायकवाड यांचा महसूल विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार बाबुराव चंडोल, एम.एस. शिनगारे, पेशकार उद्धव जाधव, तलाठी कोमटवार, श्रीराम नागरे आदींची उपस्थिती होती.
रामनगर येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जालना : बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा, असे प्रतिपादन सरपंच स्वाती शेजुळ यांनी केले. रामनगर येथे शिवशंकर सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना मशरूम रोजगार प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप देशमुख, उषा चव्हाण, मीनाबाई वाहुळे, संगणक परिचालक संतोष थेटे, देविदास थोरात आदी उपस्थित होते.
विश्वनाथ भाले यांना मसापतर्फे श्रद्धांजली
जालना : व्यवस्थेच्या वेदनांना आपल्या शब्दवैभवातून ‘अस्वस्थ’ साकारणारे सुप्रसिद्ध कवी कैलास भाले यांचे वडील विश्वनाथ भाले यांचे रविवारी निधन झाले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना ‘काव्यात्मक श्रद्धांजली’ वाहण्यात आली. यावेळी कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, प्रा. रमेश भुतेकर, राम गायकवाड, शिवाजी कायंदे, डॉ.प्रभाकर शेळके, सुनील लोणकर आदींची उपस्थिती होती.
टेंभुर्णी येथे बालकांना पोलिओ डोस
टेंभुर्णी: टेंभुर्णी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ० ते ५ वर्षांच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. येथील पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या बुथवर एका बालिकेला पोलिओ डोस पाजण्यात आला.
व्यापारी महासंघाचा संपर्क दौरा
जालना : व्यापारी महासंघ, जिल्हा जालना तालुका व ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या नेतृत्वाखाली ९ फेब्रुवारीपासून पाच दिवसीय जिल्हा संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात सुखदेव बजाज, अंकुश राऊत, कासीम बावला, प्रवीण मोहता, जगन्नाथ थोटे, विजय सुराणा, अतुल लढ्ढा, सतीश पंच आदी सहभागी होणार आहेत. या अंतर्गत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्या जाणार आहे, असे सांगण्यात आले.
सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील शिवाजी खरात यांची शासकीय जिल्हा अपंग निधी सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधाकर दानवे, शंकर भुते, बंटी औटी, संग्राम देशमुख, बाबुराव तराळ, अनिल सुरडकर, पंडित घनघाव, कल्याण तराळ, गणेश तराळ, लक्ष्मण गावंडे यांची उपस्थिती होती.