शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:48 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या २७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २७ हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात २३ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या १४ हजार ७९२ तर मुलींची संख्या ८९८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.३५ असून मुलींचा निकाल ९१.१७ टक्के इतका लागला आहे. निकाल कसा लागेल या भीतीने सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती दिली. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणींना संपर्क करून माहिती दिली. तसेच एकमेकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी नेहमीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे.भोकरदन तालुक्याचा निकाल ९३ टक्केभोकरदन : तालुक्यात बारावीचा निकाल ९३़७२ टक्के लागला आहे़ १२ वीच्या शालांत परीक्षेसाठी तालुक्यातून आठ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७ हजार ७८५ विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. भोकरदनच्या शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७़५२ टक्के, रामेश्वर महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के, शारदा विद्या मंदिर वरूडचा निकाल ९६़७७ टक्के, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय हसनाबादचा ९८़२६, छत्रपती संंभाजी विद्यालय तांदुळवाडीचा १०० टक्के, मोरेश्वर विद्यालय राजूरचा ९२़५० टक्के, प्रियदर्शनी कन्या विद्यालय भोकरदनचा ८६़६६ टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूलचा ९५़९६ टक्के, सत्यशोधक माध्यमिक विद्यालयाचा ९८़८९ टक्के, न्यू हायस्कूल भोकरदनचा ९२़०२ टक्के, असा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी कौतुक केले आहे.जाफराबाद तालुक्यातील महाविद्यालयांनी राखली निकालाची परंपराजाफराबाद : जाफराबाद तालुक्याचा एकूण निकाल ८८.१८ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी यश संपादन केले. तालुक्यातील ज्ञानसागर विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८४ टक्के, ज्ञानसागर विद्यालय सिपोराअंभोराचा एकूण निकाल ९०.७६ टक्के, समर्थ जूनियर कॉलेजचा ९४.०० टक्के, राजे संभाजी विद्यालय जवखेडचा ९७.४५ ,जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय टेंभूर्णीचा ९५.०० टक्के, जिजाऊ कॉलेज वरुड बु ८८.१८ टक्के, जिजाऊ कॉलेज जाफराबादचा ८६.९५ टक्के, स्वामी विवेकानंद कॉलेज ८७.०१ , नवभारत कॉलेज टेंभुर्णीचा ८१.७१ टक्के, शिवाजी कॉलेज भारज ७९.७३ , गुरुदेव कॉलेज जानेफळ ९२.३७, जयभावनी विद्या मंदिर देळेगव्हाण ९७.५२ ,आयशा उर्दू हायस्कूल जाफराबादचा ६९.८१ , जिजामाता विद्यालय निमखेडा ६८.४२ , अभिजीत विद्यालय खासगाव ५४.५४ , जाणता राजा विद्यालय अकोला देव ९३.१८ , कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभूर्णी ८५.४८ , स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा ९३.३३, दीपभारती विद्यालय माहोरा ९१.३० टक्के, सिध्दार्थ महाविद्यालय जाफराबादचा ९५ टक्के तर भारतमाता महाविद्यालय वरुड बुद्रूक ८७ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र