कारवाईची मागणी
बदनापूर : शासनाने गुटखाविक्रीस बंदी घातली आहे. परंतु, शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गुटखाविक्री जोमात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैधरित्या गुटखाविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गांधीजींना अभिवादन
जालना : तालुक्यातील नाव्हा येथील संतुकराव खोमणे महाविद्यालयात महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवान भुतेकर, प्रा. अश्विनी क्षीरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी आदींची उपस्थिती होती.
सूचनाफलक गायब
मंठा : मंठा ते जालना मार्गावरील अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचनाफलक गायब झाले आहेत. नामफलकांअभावी चालकांची गैरसोय होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ठिकठिकाणी कचरा
जालना : शहरातील भाग्यनगरमध्ये कचरा साठविण्यासाठी कचराकुंडी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे घंटागाडी आली नाही, तर नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत.