शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंकुशनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:40 IST

दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली.औरंगाबाद - बीड राष्ट्रीय महामार्गावर अंकुशनगर ( दिशानगरी) येथील गणेश अंकुशराव सुरासे हे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना हे कर्मचारी असून हे रात्री गच्चीवर झोपलेले होते. त्यांना अचानक जाग आली असता समोर चार ते पाच चोरटे दिसले. यामुळे गणेश सुरासे यांनी आरडा ओरडा करून चोरट्यांनी पळवून लावण्यासाठी गच्चीवर असलेले फावडे हातात घेऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हा आरडा ओरडा ऐकून घरातील अन्य व्यक्ती जागे झाले परंतु चोरट्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला. पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी गणेश सुरासे यांच्या पत्नी जयश्री सुरासे, मुलगा गणेश सुरासे व अन्य सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. चोरट्यांना रोखण्यासाठी जयश्री सुरासे यांनी तिखटाची भुकटी चोरट्यांच्या दिशेने फेकली. परंतू, अशाही स्थितीत चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून घरातील कपाट्याच्या चाव्या घेऊन त्यातील रोख ३५ हजार रूपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण पावने तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकारामुळे सुरासे कुटुंब भयभीत झाले.दरम्यान, चोरट्यांना रोखण्याच्या प्रयत्नात जयश्री सुरासे यांना चाकूचा वार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.दरम्यान, परिसरातील नागरिकांना दरोड्याची माहिती मिळाली असता नागरिकांनी तेथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, चोरटयांनी त्या नागरिकांवर तुफान दगडफेक सुरू केली. रस्त्यावर येणा-या जाणा-या वाहनांवरही दगडे फेक केल्याने नेमके काय सुरू आहे हेच वाहनधारकांना समजले नाही.चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात नागरिकांनी पुढाकार घेतला परंतू, चोरट्यांकडे धारदार शस्त्र असल्याने त्यांच्या जवळ जाणे शक्य नसल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत गावातून पोबारा केला.दरोड्याची माहिती काही जणांनी गोंदी पोलीसांना दुरध्वनीद्वारे कळविली. माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचेकर्मचारी पो.कॉ.गणेश बुजाडे,अंकुश दासर, योगेश दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.एकूणच गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने ग्रामीण भागातभीतीचे वातावरण पसरले आहे.याकडे पोलिसांनी लक्षघालून चोरट्यांना जेरबंदकरावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारी