शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तीन रोहित्रे जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:31 IST

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गावात तीन रोहित्रे बसविण्यात आली होती. मात्र, वीजचोरांच्या आकड्यांमुळे भार वाढल्याने शनिवारी एक -दोन नव्हे, तीन रोहित्र जळून खाक झाली.दोन महिन्यांपूर्वी कुंभार पिंपळगाव येथील बकरी बाजार परिसरातील दोन व ग्रामपंचायत परिसरातील दोन रोहित्रे जळाली होती. मात्र, त्याची वेळेत दुरूस्ती झाली नाही. वीजचोरांचे आकडे वाढल्याने नंतर जायकवाडी वसाहत आणि बीएसएनएल कार्यालय परिसरातील रोहित्र जळून खाक झाले. सहा रोहित्रे बंद असल्याने वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तीन नवीन रोहित्रे गावात आली होती. मात्र, दोन रोहित्रे नादुरूस्त होती. ती बदलून आणल्यानंतर गावातील विविध भागांत लावण्यात आली. तीन रोहित्र बसतात न बसतात तोच वीजचोरांच्या आकड्यांचा भार वाढल्याने शनिवारी गावातील बसस्थानक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर व तिरूपती कॉम्प्लेक्स परिसरातील तीन रोहित्रे जळून खाक झाली आहेत. लागलेली आग इतकी भीषण होती की रोहित्राचा स्फोट होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. आग लागल्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी फिरकले नाहीत. गावातील सहा डीपी बंद असल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज