शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

परतूर पोलीस ठाण्यात सात महिन्यांत तीन पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:13 IST

पोलीस ठाण्याचा कारभार मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या हाती देण्यात आला आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील पोलीस ठाण्याचा कारभार मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या हाती देण्यात आला आहे. विविध कारणास्तव बदल्या होत असल्याचे ठाण्याचे कामकाज सुरळीत होणार कसे आणि गुन्हेगारांवर वचक बसणार कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जालना जिल्ह्यात परतूर शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतरराज्यीय गुन्हेगारांचा वावर असल्याचे यापूर्वीच्या पोलीस कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे चोऱ्या, धाडसी चो-या, मारामा-या, दिवसा ढवळया रिव्हालवर लावून सोन्या-चांदीच्या दुकानाची लूट, धमकावणे आदी प्रकार सातत्याने घडतात. शहरात मागील दोन वर्षात मोठया प्रमाणात चो-या झाल्या आहेत. याबरोबरच ग्रामीण भागातही धाडसी चो-या होऊन लाखो रूपयांचा ऐवज चोरीस गेला. या चोऱ्यांचे तपास अद्याप गुलदस्त्यात आहेत. दिवसेंदिवस शहरातही गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंद्यातून होणारी कमाईही या गुन्हेगारीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याला जबाबदार अधिकारी देवून स्थैर्य येणे महत्वाचे आहे.पोलिस ठाण्याचा, गवांचा, गुन्हेगार व गुन्हेगारीचा अभ्यास होण्यापूर्वीच पोलिस निरीकांची बदली होते आहे. परतूर ठाण्याच्या बाबतीत हा प्रकार सुरू असून, मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांनी ठाण्याचा कारभार पाहिला आहे. तर तीन वर्षात सहा पोलिस निरीक्षक लाभले आहेत. किमान तीन वर्षे एक अधिकारी ठाण्याचा प्रभारी म्हणून काम पाहतो. मात्र, गत तीन वर्षापासून परतूर ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा खेळ सुरू आहे.९ फेब्रुवारी २०१६ रोजी घनश्याम पाळवदे यांनी पोलिस निरीक्षक म्हणून पदभार घेतला. ते दोन वेळा बदलून गेले आणि पुन्हा आले. २४ मार्च २०१६ रोजी महादेव राऊत आले. मात्र, ते केवळ तीनच महिने राहिले. ३० मे २०१७ रोजी आर.टी. रेंगे यांनी पदभार घेतला. रेंगे यांचा कार्यकाळ केवळ १७ महिन्यांचाच ठरला. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेंद्र गंदम यांनी पदभार घेतला. मात्र, त्यांचीही अचानक तडकाफडकी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सुभाष भुजंग यांची दहा-पंधरा दिवसातच बदली झाली. सद्यस्थितीत पोनि शिरीष हुंबे यांच्याकडे ठाण्याचा पदभार आहे.१३ आॅगस्ट २००९ पासून केवळ गणेश जवादवाड यांनीच आपला कार्यकाळ पूर्ण करून गुन्हगारी जगतावर वचक निर्माण केला होता. त्यानंतर १४ जून २०१३ ते आजपर्यंत म्हणजे सहा वर्षात ११ पोलिस निरीक्षक या ठाण्याला लाभले. पोलिस निरीक्षकांचा कार्यकाळ अल्प ठरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या अडचणी निर्माण होण्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिसTransferबदली