शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:13 IST

जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली. मंगळवारी सायंकाळी तीन मित्र हे तळ्यावर फ्रेश होण्यासाठी गेले होते, पैकी एका युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. रात्री अंधार झाल्याने त्या युवकाचा मृतदेह काढता आला नाही. बुधवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने तीन तास तळ्यात शोध घेऊन त्या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.या विषयी चंदनझिरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी, भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील तीन तरूण हे मंगळवारी आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आले होते. सायंकाळी हे तिघेही आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या साठवण तलावाजवळ फ्रेश होण्यासाठी गेले होते. अनिल गजानन फुके (वय २५) सुनील बर्डे आणि विलास बर्डे हेही त्याच्या सोबत होते. अनिल फुके हा तळ्यात आत खोलवर गेल्याने त्यात बुडला होता. तो बुडत असतांना त्यांच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु तो पर्यंत पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता.मंगळवारी सायंकाळी चंदनझिरा पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु अंधार पडल्याने बुधवारी सकाळीच पुणे येथून आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. या पथकाने बोटीच्या मदतीने अनिल फुकेच्या मृतदेहाचा तब्बल तीन तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह बारा वाजेच्या सुमारास हाती लागला. बुधवारी सकाळी नऊ वाजता शोधकार्य सुरू करण्यात आले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ.) ची पाचवी वाहिनी पुणे येथील कमांडर महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एम.नवले, व्ही.जोगाराव, हरिहर घुले, विकास राऊत, प्रमोद पाटील, समाधान खैरनार यांच्यासह सोळा जवानांची टीम हा मृतदेह शोधण्यासाठी दाखल झाली होती.या जवानांनी पाण्यात उतरून आॅक्सिजनच्या सहाय्याने बुडी घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. यादरम्यान मृतदेह शोधण्यासाठी आॅक्सिजनचे तीन सिलेंडर लागल्याचे सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मयत अनिल फुकेचे शवविच्छेदन करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वीच जालना तालुक्यातील कुंभेफळ येथे तळ्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू