शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडल्याने तिघांचा मृत्यू; एका मुलासह वृद्ध महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 17:38 IST

झाडावर वीज पडल्याने दोन महिलांसह एका युवकाचा मृत्यू झाला.

 

सेवली (जालना) : झाडावर वीज पडल्याने दोन महिलांसह एका युवकाचा मृत्यू झाला. तर एका पाच वर्षीय मुलासह वृद्ध महिला जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जालना तालुक्यातील सावरगाव भागडे शिवारात घडली.जालना तालुक्यातील सावरगाव भागडे येथील गयाबाई गजानन नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी सकाळी सोयाबीनची कापणी सुरू होती. सोयाबीन कापणीसाठी सावरगाव भागडेसह सेवली येथील मजूर कामाला आले होते.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पाऊस येत असल्याने गयाबाई नाईकनवरे व इतर पाच ते सहाजण जवळच असलेल्या झाडाखाली जाऊन बसले. तर इतर मजुरांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाव घेतली. मात्र त्यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली. या घटनेत गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर मंगेश संदीप पवार (०५) सुमनबाई साहेबराव नाईकनवरे (६५) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सेवली  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सुमानबाई नाईकनवरे यांच्यावर प्रथमोपचार करून सोडण्यात आले. तर मंगेश पवार याला पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सेवली पोलीस ठाण्याचे पोनि विलास मोरे, पोहेकॉ. राठोड, नागरगोजे, खुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सिंदखेडराजा शिवारात दोघे जखमी जालना तालुक्यातील सोनेगाव येथील आबाजी सखाराम पालवे यांचे शेत सिंदखेडराज शिवारात आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या मंगल बद्रिनाथ पालवे (२४ वर्ष), शेख शब्बु शेख गुलाब (३० दोघे रा.सोनदेव. ता.जि.जालना.) हे दोघे जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.