शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

जालन्यात काँग्रेस पदाधिका-यांचे तीन दिवसीय शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:37 IST

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.गोरंट्याल म्हणाले की, काँग्रेसच्या या शिबिरात आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.प.सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेलचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेसची आजची भूमिका आणि पक्षाचे धोरण यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाईल. शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून चोखपणे काम करीत आहे. याचीच धास्ती भाजप नेत्यांनी घेतली असून, सत्तेचा दुरुपयोग करीत नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण खेळले जात आहे. नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखविले जात आहे. नैतिकतेचा वारसा सांगणाºया या पक्षाच्या नेत्यांनी सर्व नैतिकता धाब्यावर बसविल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना त्याच वॉर्डातून निवडून आणून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसे न झाल्यास या नेत्यांनी राजकारण सोडून द्यावे. नाही तर आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हान गोरंट्याल यांनी दिले. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राम सावंत, शेख महेमूद, माजी नगरसेवक वैभव उगले, विनोद यादव आदी उपस्थित होते..................................रावसाहेब दानवेंनी भूमिका स्पष्ट करावी...जालना-जायकवाडी योजनेवर केवळ जालन्याचा हक्क असताना अंबडचा हिस्सा मागितला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे गोरंट्याल म्हणाले. अंबड पालिकेचे थकित वीजबिल जालन्याने का भरावे, असा सवालही त्यांनी केला.....................................पक्ष सोडणा-यांवर कारवाईकाँग्रेस पक्ष सोडून भाजपत जाणा-या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पक्षाचा व्हीप त्यांना बजावण्यात येणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. याबाबतचे पत्र जिल्हाधिका-यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले........................