जलना : शहरातील वाढत्या चोऱ्यांना लगाम लागावा, मुख्य चौकासह बाजारपेठेतील हलचालींवर नजर रहावी, यासाठी २०१४ मध्ये जवळपास ४४ लाख रूपये खर्च करून शहरातील विविध भागात ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होेते. मात्र, देखभाल दुरूस्ती अभावी यातील ४० हून अधिक कॅमेरे डॅमेज झाले असून, पोलीस मुख्यालयाशी असलेली कनेक्टिव्हिटीही बंद पडली आहे.जालना शहरासह परिसरात वाढलेल्या चो-या रोखणे, मुख्य बाजारपेठ, मुख्य चौकातील हलचालींवर नजर ठेवण्यासाठी जालना शहरात सन १०१४ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ४४ लाख रूपये निधी खर्च करून ३५ ठिकाणी ७० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे या कॅमे-यांच्या कक्षेत येणाºया हलचालींवर पोलीस दलाच्या वतीने बारकाईने नजर ठेवली जात होती. शिवाय एखादी चोरीची घटना असो किंवा कॅमेºयाच्या समोर होणाºया हाणामारी, कायद्याचे उल्लंघन होणाºया बाबी असोत यावर मोठा चाप बसला होता.मात्र नंतरच्या काळात या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. शिवाय पोलीस दल आणि पालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.मध्यंतरीच्या गणेशोत्सव, दस-याच्या कालावधीत काही ठिकाणचे कॅमेरे पालिकेच्या वतीने दुरूस्त करून पोलीस नियंत्रण कक्षातील कनेक्टिव्हीटी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ही कनेक्टिव्हीटी बंद पडली आहे. शहर व परिसरात होणारी वाहन चोरी, शहरातील घटनाघडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सीसीटीव्हींची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.....तर पोलिसांना मिळतील पुरावेजालना शहरात होणारी वाहन चोरी, घरफोड्या, दुकानातील चोरीसह मुख्य चौकात, बाजारपेठेत अनेक गुन्हेगारी कृत्य घडतात. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर पोलिसांना तपासात पुराव्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. शिवाय कॅमेºयांची नजर असेल अनेक घटनांना लगाम लागणार आहे.
जलना शहरातील ४० सीसीटीव्ही कॅमेरे ‘डॅमेज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:22 IST
देखभाल दुरूस्ती अभावी यातील ४० हून अधिक कॅमेरे डॅमेज झाले असून, पोलीस मुख्यालयाशी असलेली कनेक्टिव्हिटीही बंद पडली आहे.
जलना शहरातील ४० सीसीटीव्ही कॅमेरे ‘डॅमेज’!
ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी बंद : शहरातील मुख्य ठिकाणच्या हालचाली होईनात कॅमेऱ्यात कैद