शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिघेला मारहाण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:29 IST

बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेंसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांना मारहाण करणा-या तीन आरोंपींना पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील चितोडा येथील राष्ट्रवादी कॉग्रेंसचे कार्यकर्ते भीमराव डिघे यांना मारहाण करणा-या तीन आरोंपींना पोलिसांनी शनिवारी रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली. भीमराव डिघेला मारहाण केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कृष्णा दौलतराव सलामपूरे (३०) भरत चतुरसिंग तिलवरवाले (२८) (दोघे रा. ढवळेश्वर), अर्जुन उर्फ राजू नामदेव कापसे (रा. तांदूळवाडी) यांचा समावेश आहे.रविवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी यांचे सोशल मीडियाचे डिघे काम पाहतात. भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा कारणावरुन भीमराव यादवराव डिघे यांना १२ नोव्हेंबर रोजी राजूर रस्त्यावर तिघांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चांगलेच राजकारण तापले आहे.शनिवारी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जखमी भीमराव डिघे यांची भेट घेऊन विचारपूस केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री तिन्ही आरोपींना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली. रविवारी तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गेल्या काही दिवसांपासून या वादामुळे बराच राजकीय गोंधळ उडाला होता. या पकडलेल्या आरोपींकडून अधिक माहिती पोलीस काढणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliticsराजकारण