शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट

By शिवाजी कदम | Updated: September 25, 2023 17:46 IST

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट

- पवन पवारवडीगोद्री:मराठा आरक्षण आंदोलन व पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर अंतरवाली सराटी हे गाव राज्यात गाजत आहे. आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या या गावात गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडत आहे. येथे पहिल्यांदाच एक गाव एक गणपतीची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गावातील गणेशोत्सव व्यापक बनला असल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांचे साखळी उपोषण सुरू आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज बांधव येथे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी येथे येत आहेत. यानंतर उपोषणस्थळाच्या जवळच असणाऱ्या गणरायाचेही ते दर्शन घेतात. येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. रोज दोन वेळा गणरायाची आरती, भजन कीर्तनाचे कार्यक्रम येथे पार पडत आहेत.

अंतरवाली सराटी या गावाची ख्याती मनोज जरांगे - पाटील यांच्यामुळे सर्वदूर पसरली आहे. मनोज जरांगे यांनी १७ दिवस उपोषण केल्यानंतर आता साखळी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जसे गाव एकत्र आले, त्याचप्रमाणे येथे पहिल्यांदाच एक गाव एक गणपती विराजमान झाले आहेत. यामुळे गावात शांतता असून, भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.

यावर्षी एकच गणपतीयेथे पाच ते सहा सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन करण्यात येतात. यंदा आंदोलन सुरू असल्याने गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे व साखळी उपोषणाला भेट देणारे मराठा बांधव गावातील गणरायाचे दर्शन घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे.- अनिल तारख, अध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ, अंतरवाली सराटी.

यावर्षीपासून परंपरा सुरु आमच्या गावात दरवर्षी पाच ते सहा सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन होतात. परंतु, यावर्षी एक गाव एक गणपती ही परंपरा गावकऱ्यांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून येणारे मराठा समाज बांधव श्रींचे दर्शन घेत आहेत.- राधाकिसन सुरासे, उपाध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना