शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जालना जिल्ह्यात रोहयोच्या ७१४ कामांवर तेरा हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:16 IST

जालना जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.सध्या कडक उन्हामुळे शेतातील कामांची संख्या मंदावली आहे. त्यामुळे अनेकजण हे रोजगाराच्या संधी शोधत आहेत. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेमुळे हक्काच्या रोजगाराची संधी मिळत असल्याने या कामावर जाण्यासाठी आता मजूरांची संख्या वाढली आहे. सध्या अकुशल कामाच्या माध्यमातून मोठी कामे केली जात आहेत. त्यात कृषी, वनविभाग तसेच गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे रोजगार हमी विभागाकडून सांगण्यात आले.सद्यस्थितीत या मजूरांना दररोज २०३ रूपये प्रमाणे मोबदला दिला जात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये रोजगार हमीच्या कामांवर ४२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यातील मजुरीपोटी जवळपास ९ कोटी ५१ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर ३० पेक्षा जास्त मजूर असतील त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी एका स्वतंत्र व्यक्तीला नेमण्यात येत आहे. तसेच मजूरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी देखील एका महिलेला नेमण्यात येऊन त्या महिलेलाही स्वतंत्र रोजगार दिला जात आहे.एकूणच या विभागाकडून मागेल त्याला काम देण्यासाठीची आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सध्या परतूर, मंठा आणि भोकरदन तालुक्यातून बऱ्यापैकी कामांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.दिल्लीचे पथक येणारराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेचे काम नेमके कसे सुरू आहे, याची चाचपणी करण्यासाठी दिल्ली येथून एक स्वतंत्र पथक गुडगव्हर्नस अंतर्गत येणार आहे. त्यात आता ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्या ठिकाणी कामाचा तपशील असणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कामाचा पूर्ण तपशील तसेच येणारा खर्च आणि प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च याची माहिती द्यायची आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना