शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का
4
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
5
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
6
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
7
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
8
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
9
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
10
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
11
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
12
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
13
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
14
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
15
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
16
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
17
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
18
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
19
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
20
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)

जिल्हा मध्यवर्ती बँकेची खिडकी फोडून चोरट्यांनी तिजोरी पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:00 IST

वाटूर येथे चोरट्यांनी बुधवारी रात्री बँकेची खिडकी तोडून ही तिजोरी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यांत दुसरी घटनासात लाख रुपये लंपास

परतूर : गेल्या दोन महिन्यांमध्ये जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी लांबविण्याची ही दुसरी घटना घडली असून, यापूर्वी घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी येथील मध्यवर्ती बँकेची तिजोरी पळवून नेली होती. त्यातही अशीच रक्कम होती. वाटूर येथे चोरट्यांनी बुधवारी रात्री बँकेची खिडकी तोडून ही तिजोरी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात बँकेची खिडकी तुटल्याचे दिसले. त्यांनी लगेचच बँकेसह पोलिसांना याची कल्पना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेऊन पाहणी केली. असता, सराईत चोरट्यांचे हे काम असावे असे दिसून आले. यापूर्वी देखील याच बँकेची घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी येथील बँकेची तिजोरी लंपास केली होती. परंतु पोलिसांनी ती तिजोरी जप्त केली होती. त्यावेळी देखील ती तिजोरी चोरट्यांना फुटली नव्हती, तशाच प्रकारची ही तिजोरी दणकट असून, गोदरेज कंपनीची आहे. ही तिजोरी देखील साधारणपणे १९८७ मध्ये खरेदी करण्यात आली होती. असे सांगण्यात आले. 

चोरट्यांनी बँकेतील तिजोरीसह अन्य साहित्यही लांबविल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी नव्याने रूजू झालले विक्रांत देशमुख, परतूरचे पोलीस निरीक्षक हुंबे, मंठ्याचे पोलीस निरीक्षक निकम यांच्यासह बँकेचे चेअरमन मनोज मरकड, व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख  आदींनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकलाही पाचारण करण्यत आले होते.  या प्रकरणात वाटुर येथील बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी साळवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत असल्याचे सांगण्यात आले. 

जालन्यातील चोरीचा तहपासही रखडलाजालना येथील सकलेचानगरमध्ये झालेल्या शंकर शर्मा यांच्या घरातील तेरा लाख रूपयांच्या चोरीचाही तपास अद्याप रखडलेला आहे. यात आणखी कुणालाच अटक केली नसल्याचे सांगण्यात आले. शर्मा यांच्या घरातील चोरी तसेच वाटुर येथील बँक फोडी प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.  

टॅग्स :RobberyचोरीJalanaजालनाPoliceपोलिस