शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 19:24 IST

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार: मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणीतरी नेताच असणार, कशातही पैसै खायची सवय लागली यांना, सगळ्यांना जेलमध्ये टाका सोडू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर दिली. हे लोक चांगले काम करत नाहीत. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय देशाचे दैवत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहेत, असे म्हणत जरांगे यांनी आता मोदी साहेबांनी छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केल होत हे विसरून जाऊ नका, ध्यानात ठेवा, असा टोलाही लगावला. 

जरांगे पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. यांना कशात खाव हे सुद्धा कळत नाही. कोण कॉन्ट्रॅक्टर, कोणी उद्घाटन केलं, मोदी साहेबांना उद्घाटन केल म्हणतात. ते इतक्या अडचणीत कुठे गेलते. इतक्या लांब आता त्यांना दोष देऊन उपयोग नाही. उद्घाटकाचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार, असे म्हणत जरांगे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले.  परंतू हे असले लोक ज्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा कळत नाही त्यांना सोडलेच नाही पाहिजे. यांना एकदाच अद्दल घडायला पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली. 

पुतळे, स्मारकावरून राजकारण्यांना खडेबोलपुतळ्याची देखरेख करण गरजेच आहे. नुसता पुतळा उभा केला की प्रशासन ही मोकळ होत. प्रत्येक ठिकाणी असेच आहे. निवडणुका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचे सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे. आता नुसते उद्घाटन उद्घाटन निवडणुका निवडणुका सुरू आहे. दैवताचे अपमान करू नका. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात फक्त निवडणुका आल्यावर बोलायचं, हे बंद करा आता, असे खडेबोल जरांगे यांनी राजकारण्यांना सुनावले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीJalanaजालना