शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७२ तासांनंतरही पंचनामे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. 

जालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिला. रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वा-याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुके गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसानग्रस्त झाले आहेत. या तालुक्याचा बुधवारी धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून जाणून घेतली. सरकारने ४८ तासांत पंचनामे करण्याचे जाहीर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी मुंडेंशी बोलताना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनिटांचा धावता दौरा करताना आमच्या शेतांची साधी पाहणीही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतक-यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.मुंडे म्हणाले की, आपण शेतक-यांच्या पाठीशी असून, शेतकºयांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतक-यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतक-यांचा अंत पाहू नका. आज पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांना आधार न दिल्यास ते उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलू चौधरी, बळीराम कडपे, अ‍ॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते.