शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

...तर वाघनखांचा सामना करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:32 IST

आमच्या अंगावर कोणी आले, तर आमच्या शिवसैनिकरूपी वाघांच्या नखांसोबत सामना करावा लागेल, असा इशारा राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी बदनापूर येथे दिला.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : कार्यकर्ता मेळाव्यात इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : आमच्या अंगावर कोणी आले, तर आमच्या शिवसैनिकरूपी वाघांच्या नखांसोबत सामना करावा लागेल, असा इशारा राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी बदनापूर येथे दिला.बदनापूर येथील बाजार समिती आवारामध्ये आयोजित शिवसेनेच्या सदस्य नोंदणी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खा. दानवे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, सध्या त्यांचे भाषण माझ्या नावाने सुरू होते व माझ्या नावानेच संपते. त्यांना जिथ उत्तर द्यायचे तिथे मी देईल. मी त्यासाठी समर्थ आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही कुणाच्याही शेपटीवर पाय दिला नाही. मात्र त्यांनी आमच्या शेपटीवर पाय दिला आहे. आमची वाघनखे बाहेर पडल्यानंतर कोथळा बाहेर निघेल. अंगावर याल तर याद राखा, असा इशाराही त्यांनी दिला.नांदेडचे पालकमंत्री पद मी स्वत: रामदास कदम यांना देण्याची विनंती केली. कारण कदम हे आमचे नेते आहेत. मला कोणताही जिल्हा चालेल. या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनती असून, या भागातील जनता शिवसेनेमागे आहे. पुढील विधानसभा व लोकसभेचे मतदान केवळ शिवसेनेच्याच बाजूने झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, भाजप मित्रपक्ष आता केवळ नावालाच असून, आता मुख्य शत्रुपक्ष तोच झाला आहे. खोतकरांची बदनामी करून आपले नेतृत्व संपवायचे कुटील राजकारण सध्या होत आहे. आपापसातील तक्रारी, कुरबुरी बाजुला ठेवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावीे, असे आवाहन केले. माजी आ. संतोष सांबरे, किसान सेना जिल्हासंघटक भानुदास घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांचीही यावेळी भाषणे झाली.कार्यक्रमास जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, भगवान कदम, जि. प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भारत मदन, श्रीराम कान्हेरे, राजेश जºहाड, राजेंद्र जºहाड आदी उपस्थित होते.