मेडिकलसमोर उभी
केलेली दुचाकी लंपास
जालना : मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास केल्याची घटना जालना शहरातील मंठा चौफुली येथील अनन्या मेडिकलसमोर घडली. याप्रकरणी शिवदीप शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जालना शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दुचाकी चोऱ्यांमधील आरोपींना विविध ठाण्यांतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू
जालना : दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना देऊळगावराजा रोडवरील जामवाडीजवळ घडली. डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. आदित्य दत्तात्रय भोपळे (दत्तनगर, देऊळगावराजा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डोईफोडे करीत आहेत.