शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मंदिरात चोरी; रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या सहा मूर्तीं लंपास

By विजय मुंडे  | Updated: August 22, 2022 11:30 IST

श्रीराम, सीता माता, लक्ष्मणासह हनुमानाच्या दोन मूर्ती लंपास

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता माता, लक्ष्मण व हनुमानाच्या दोन पंचधातूच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास तीर्थक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथे घडली आहे. ऐतिहासिक मंदिरातून पंचधातूच्या सहा मूर्तींची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. या घटनेबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विक्रांत शिंदे, डीवायएसपी सुनील पाटील, पोनि. प्रशांत महाजन, पोउपनि. संतोष मरळ आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. शिवाय तपासासाठी पथकेही रवाना केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चोरट्यांना महावितरणचे सहकार्य, ग्रामस्थांचा आरोपचार हजार लोकसंख्येच्या तीर्थक्षेत्र जांबसमर्थ गावातील वीजपुरवठा सातत्याने गुल होत आहे. पहाटेच्या वेळीच अचानक वीजपुरवठा खंडित होत असून, महावितरणचा हा प्रकार म्हणजे चोरट्यांना सहकार्य करण्यासारखा असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मंदिरात सुरक्षा रक्षक नाहीजांब समर्थ मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा आहे. परंतु, या मंदिराच्या सुरक्षेसाठी अद्याप सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यात पहाटे वीज जात असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना