शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू

By दिपक ढोले  | Updated: July 20, 2023 19:33 IST

ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

भोकरदन : पप्पा मला घाम आलाय, असे म्हणताच एका तरुणाचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. विकास नवल (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.वाडी खुर्द येथील शेतकरी गुलाबराव रामा नवल हे आपल्या दोन्ही मुलांसह गुरुवारी सकाळी शेतात गेले होते. दोन्ही मुलांना घेऊन त्यांनी सोयाबीनच्या शेतात कोळपणी सुरू केली. ११ वाजेच्या सुमारास विकास नवल हा त्यांच्याजवळ होता. त्याचवेळी पप्पा मला घाम येतोय, असे म्हणताच विकास जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा हदयविकाराच्या झडक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विकास हा पाथर्डी येथे बी.एस्सी. ॲग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो काही दिवसांपूर्वीच गावाकडे आला होता. तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस होत होता. त्यातच गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने तिघेही जण शेतात गेले होते. तेथेच विकासचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यू