शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले- रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:09 IST

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

भोकरदन: शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक नेते त्यांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठा समाजासाठी कायम संघर्ष करणारे माजी आ.विनायक मेटे यांचे झालेले अपघाती निधन मनाला चटका लावणारे ,असून त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी  प्रतिक्रिया दानवेंनी भोकरदन येथे दिली आहे.

दानवे म्हणाले की विनायक मेटे हे वेगळ्या पक्षात काम करीत असले तरी ते मराठा महासंघाचे काम करीत होते. तेव्हा पासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. ते अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले हे नेतृत्व होते. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले ते नेते होते. विनायक मेटे हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर सकल समाजाचे ते नेते होते. अति सामान्य कुंटुंबातुन आलेले प्रचंड आत्मविश्वास जिद्द व मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे विनायक मेटे.

शिवसंग्रामच्या माध्यमातुन त्यांनी उत्तम संघटन व भरीव सामाजिक कार्य त्यांनी केले. सरकार कोणतेही असो त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी अतिशय चांगले संबध होते. त्यातुन ते सामाजिक कामे करत होते.  एक उद्धार कर्ता आपण गमावला असून ही पोकळी आता भरून निघने कठीण आहे. असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेraosaheb danveरावसाहेब दानवे