शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

By विजय मुंडे  | Updated: December 16, 2023 19:42 IST

अंतरवाली सराटीत महत्वपूर्ण बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील जाहीर करणार भूमिका

वडीगोद्री (जि.जालना) : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यामागणीसाठी शासनाला २४ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा काय असावी यावर चर्चा करण्यासाठी रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांशी संवाद साधून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची १४ ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणी विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक होणार आहे. रविवारी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत परिचय बैठक होणार आहे. तर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार आहे. यामध्ये राज्यभरातील मराठा समाजासह स्वयंसेवक, आयोजक, साखळी उपोषणकर्ते, डॉक्टर, वकील, अभ्यासक, साहित्यिक, इतिहास अभ्यासक सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला २४ तारखेपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचे आंदोलन शांततेत असले तरी मोठे आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात येत्या रविवारी आंदोलनाची पुढील रणनिती ठरविली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मी माझा निर्णय समाजावर लादत नाही. कारण मी समाजापेक्षा मोठा नाही. मी मराठा सेवक आहे. सोशल मीडियावर जे व्हिडिओ, संदेश व्हायरल होत असतील ते समाजाची भावना, खदखद असू शकते असे ते म्हणाले. समाजाच्या हिताचा विषय असल्याने सर्वांनी उपस्थित राहावं, आमंत्रण सगळ्या समाजाला आहे, आमंत्रणाची वाट पाहात बसू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षकांनी साधला संवादमराठा समाजाची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वडीगोद्री येथील ओबीसी साखळी उपोषणास भेट देवून संवाद साधला. शिवाय मराठा आंदोलकांशीही संवाद साधला. कोणीही कायदा हातात घेवू नये, सामाजिक भावना दुखावतील अशा घोषणा देवू नयेत, असे आवाहन केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे,सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत आदी होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना