शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून

By दिपक ढोले  | Updated: July 4, 2023 21:00 IST

नातेवाइकांनी सुनील यास जखमी अवस्थेत घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 

जालना: विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चुलत्याने पुतण्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा  येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. सुनिल प्रकाश पवार (२३), असे मयताचे नाव आहे.  या प्रकरणी मंगळवारी   घनसावंगी पोलिस ठाण्यात तिघांवर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

देवनगर तांडा येथे सुनिल प्रकाश पवार हा पत्नी, यशोदा (२३), आई बबिता व अडीच वर्षांच्या मुलासह राहतो. शेजारीच त्याचा चुलता संशयित प्रल्हाद नामदेव पवार याचे घर आहे. दोघांमध्ये शेतातील विहिरीच्या पाण्यावरून सतत वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी आठ वाजता सुनिल पवार हा कुटुंबियांसह घरी असताना, त्याचा पत्नी यशोदासोबत घरात पिण्यासाठी पाणी नसल्याच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा घराशेजारी राहणारा संशयित प्रल्हाद  पवार, त्याची पत्नी व वडील नामदेव पवार हे तिथे आले.

प्रल्हाद पवार याने तू विहिरीच्या पाण्यावरून कुणाला शिवीगाळ करतो, असे म्हणून वाद घालायला सुरुवात केली. तेव्हा सुनील याने आज विहिरीतील पाणी भरण्याची आमची बारी असताना तुम्ही विहिरीचे पाणी उपसले, आता घरी पिण्यास पाणी नाही, असे सांगत असताना, प्रल्हाद पवार याने पुतण्या सुनील यास घराच्या ओट्यावरून खाली ओढले. आज तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत पत्नी व वडिलांना त्याला पकडून ठेवण्यास सांगितले.  नंतर कंबरेचा चाकू काढून सुनील याच्या पोटात, मानेवर, हाता-पायांवरसपासप वार केले. पतीला वाचविण्यासाठी गेेलेल्या यशोदासह तिच्या सासूलाही ढकलून दिले. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी सुनील पवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळाकडे धावले. तेव्हा प्रल्हाद पवार हा घटनास्थळावरून पळून गेला. नातेवाइकांनी सुनील यास जखमी अवस्थेत घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 

तिघांविरुध्द गुन्हा दाखल या प्रकरणी मृत सुनील याची पत्नी यशोदा हिने मंगळवारी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रल्हाद नामदेव पवार, त्याची पत्नी व नामदेव सीताराम पवार यांच्या विरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे करीत आहेत. संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. महाजन यांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी