शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण थांबणार नाही; अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलक आक्रमक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:59 IST

ओबीसींच्या भावनांची सरकारला कदर नाही, अंतरवाली सराटीतील उपोषणकर्त्यांचा आरोप

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : सरकारला आणि सरकारच्या उपसमितीला ओबीसींच्या भावनांची कदर नाही, जोपर्यंत सरकार ओबीसीला आरक्षणाबाबत आश्वस्त करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार, असा इशारा अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला. आज ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 

जालना, बीड येथे झालेल्या जाळपोळीवर सरकारने एसआयटी नेमली होती, त्याचा अहवाल सरकारने जाहीर करावा. तसेच आता नव्याने मराठा आरक्षणासाठी काढलेले जीआर रद्द करावे, ५८ लाख कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करावे, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करा, यासह मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ अशा मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे ओबीसी आणदोलकांचे उपोषण सुरू आहे. आज उपोषणकर्ते विठ्ठल तळेकर यांनी सरकारला आणि उपसमितीला आमच्या भावनांची कदर नसल्याचा आरोप केला. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याच लेखी आश्वासन द्यावं, अशा मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. दरम्यान सरकार आणि उपसमितीने आश्वासन देईपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

आमच्याकडे सरकार लक्ष देत नाही. याचा अर्थ एका जातीवरच सरकार चालतंय का? असा प्रश्न ओबीसी आंदोलक बाबासाहेब बटुळे यांनी सरकारला केला. ओबीसी तुम्हाला माफ करणार नाही. ओबीसीकडे पाठ फिरवणाऱ्यांना ओबीसी समाज हात दाखवल्या शिवाय राहणार नाही, अशी नाराजी बटुळे यांनी व्यक्त केली. 

स्वाभिमानी कुंभार समाज संस्थेचा उपोषणाला पाठिंबाओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांच्या समर्थनात स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था उतरली आहे. ओबीसी आंदोलनात ओबीसी मंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री,  माजी खासदार हे सहभाग घेत नाहीत, यावरून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन हा लढा मोठा करावा, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, असे संघटनेच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे. एकच पर्व ओबीसी सर्व च्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना