शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला वाढीव मोबदला न दिल्याने कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त

By दिपक ढोले  | Updated: August 23, 2023 12:36 IST

न्यायालयाच्या आदेशाने जालना येथील लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात कारवाई

जालना : साठवण तलावात जमीन गेलेल्या शेतकऱ्याला वाढीव मोबदला न दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने जालना येथील लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीसह संगणक, सीपीओ, प्रिंटर मशीन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे.

अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील विक्रम खेडकर यांची टाका येथील गट क्रमांक ५५ क्षेत्रातील १ हेक्टर २९ आर जमीन ही शासनाने २००० साली साठवण तलावासाठी संपादित केली होती. त्यांना अत्यल्प मोबादला देण्यात आला होता. वाढीव मोबदला मिळविण्यासाठी भूमी संपादन अधिनियम १८ अन्वये सदर प्रकरण ॲड. आर.जे. बनकर, ॲड. राम गव्हाणे यांच्यामार्फत २००५ साली न्यायालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास २७ लाख ३६ हजार ७७४ व अतिरिक्त व्याजासह दावा दाखल केला होता. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अंबड व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते; परंतु त्यांनी अद्यापपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही. वेळोवेळी समन्स, जप्तीचे वाॅरंट काढूनही त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. यामुळे दिवाणी न्यायाधीश एस.पी. पैठणकर यांनी सदर संपत्ती जप्त करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार मंगळवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त करण्यात आली आहे.

...हे साहित्य केले जप्त३०० खुर्च्या, ५० टेबल, १० संगणक, १०० फॅन, ५ कूलर, २५ कपाट, ५ चारचाकी वाहने न्यायालयाने जप्त करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची, संगणक ६, सीपीओ ५, प्रिंटर ५, असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ॲड. राम गव्हाणे, डी.ई. चांदोडे, आर.एच. वाकडे, आर.जी. शेरे यांनी केली आहे.

मोबदला देण्यास नकार न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे वाढीव मोबदल्याची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यांनी मोबदला देण्यास नकार दिला. त्यामुळे ही कारवाई केली आहे. आम्ही पाच वेळा जप्त करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अधिकारी तेथे नव्हते.-ॲड. आर.जे. बनकर,

निधीची मागणी केली आहे खुर्ची जप्तीची जी कारवाई झाली आहे. ती बरोबर आहे. आम्ही मोबदला देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी केली आहे.-रोहित देशमुख, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग

टॅग्स :JalanaजालनाCourtन्यायालयFarmerशेतकरी