शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वेगात बसचालकाचा बीपी झाला हाय : प्रसंगावधान राखल्याने वाचला प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 20:34 IST

...तर घडली असती मोठी दुर्घटना

महेश गायकवाडजालना : अंबड आगारातून कुंभार पिंपळगाव मार्गे गुंजकडे ६० ते ७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचालकाचे ब्लड प्रेशर अचानक वाढले. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस एका मंगल कार्यालयाला धडकणार होती. परंतु, चालकाने अशा स्थिती प्रसंगावधान राखत बसचे ब्रेक दाबून बस थांबवली. त्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. कुंभार पिंपळगाव- गुंज रस्त्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.

रविवारी अंबड आगारातून ६० ते ७० प्रवासी घेऊन एक बस गुंजकडे निघाली होती. ही बस कुंभार पिंपळगाव येथून जात असताना गणेश कंटुले नावाच्या युवकाला बस नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आले. यावेळी प्रवाशांनाही चालकाने सीटवर मान टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे बसमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली होती. ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यंकटेश मंगल कार्यालयाजवळ थांबली. यावेळी बस चालकास रक्ताची उलटी झाल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने त्यांना ताबडतोब कुंभार पिंपळगाव येथील डॉ. गणेश तौर यांच्याकडे दाखल केले. त्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घनसावंगी शहरात हलवले. त्यांचा बीपी वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉ. तौर यांनी सांगितले.

तर घडली असती मोठी दुर्घटनानियंत्रण सुटलेल्या बसवर ताबा मिळवता आला नसता तर रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर किंवा रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात ही बस पलटी झाली असती. सुदैवाने चालकाने हृदयविकाराचा झटका येऊनही बस थांबविण्याचे साहस दाखविल्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. मी शेतातून घरी जात असताना ही बस नियंत्रणाच्या बाहेर असल्याचे लक्षात आले. मी कसेबसे स्वतःला वाचवले. घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर चालकाला रक्ताची उलटी झाल्याचे दिसले. प्रवाशांच्या मदतीने चालकाला कुंभार पिंपळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गणेश कंटुले, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Jalanaजालना