शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

By विजय मुंडे  | Updated: June 27, 2023 19:38 IST

जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

बदनापूर : महावितरणच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराने निष्काळजीपणा करीत गावठाण डीपीचे काम वेळेत केले नाही. परिणामी या कामामुळे जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विद्युत धक्का लागून दहा शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दावलवाडी (ता. बदनापूर) शिवारात घडली. या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे एका गावठाण डीपीचे काम सुरू आहे. याकरिता विद्युत खांब उभा करण्यात आले आहेत व तारा जमिनीवर पडलेल्या आहेत. गावातील शिवाजी विठ्ठल गायकवाड यांच्या दहा बकऱ्या मंगळवारी सकाळी गावातच चरत होत्या. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे भूमिहीन असून, शेळी पालनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

परंतु अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गायकवाड व ग्रामस्थांनी बदनापूर पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे. त्यामध्ये वीज वितरण कंपनी व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत सेलगाव येथील वीज वितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर नंतर बोलतो असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.तत्काळ नुकसान भरपाई द्याग्रामपंचायत सदस्य गणेश जगताप म्हणाले, महावितरण व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे एका भूमिहीन पशुपालकाचे दहा शेळ्या दगावल्या असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावठाण डीपीचे काम लवकर करण्यासाठी संबंधितांकडे आम्ही अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु हे काम लवकर झाले नाही आणि ही घटना घडली. आता महावितरणने तातडीने गायकवाड यांना नुकसान भरपाई द्यावी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना