शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

तेलंगणाप्रमाणे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्याचा कायदा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:34 IST

जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज सर्वत्र बेरोजगारी वाढत आहे, सरकारी भरतीला मर्यादा असतात, त्यामुळे खासगी उद्योगात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ४० पेक्षा अधिक कंपन्यांनी स्टॉल उभारले असून, त्यातून अनेकांना हक्काचा रोजगार मिळेल असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.रविवारी येथील शाम लॉज समोरील अर्जुन खोतकर व्यापारी संकुलात शिवसेनेतर्फे नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, संजय खोतकर, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह अन्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोगारांना नोकरी मिळावी म्हणून यापूर्वीही आम्ही नोकरी मेळावा घेतला होता. त्यातील दोन जण तर उच्च पातळीवर नोकरी करत आहेत. याही मेळाव्यातून अनेकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात जालन्यासह, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांची दालने उभारली आहेत. त्यांना पात्र आणि कुशल मनुष्यबळाची मोठी गरज लक्षात घेऊन आपण त्यांना जालन्यात निमंत्रित केले आहे. भविष्यात ज्या प्रमाणे तेलंगणामध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणारा कायदा केला आहे, त्या पार्श्वभूमिवर आपल्या महाराष्ट्रात तसा कायदा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भास्कर अंबेकर यांनीही विचार मांडले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नसल्याने अनेकजण बेरोजगार आहेत.त्यामुळे हा महोत्सव म्हणजे युवकांसाठी मोठी संधी आहे. मी आणि खोतकरांनी देखील महाविद्यालयीन जीवनात असतांना पोलिस दलात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले होते. असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नवगिरे यांनी केले.एक हजार जणांना संधीरविवारी पार पडलेल्या नोकरी मेळाव्यात विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बँक, एलआयसी यासह अन्य कंपन्यांचे स्टॉल येथे लावले होते.यावेळी दोन हजारपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास एक हजार बेरोजगारांना नोकरीची हमी मिळाल्याची माहिती संयोजकांनी दिली.

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीjobनोकरीArjun Khotkarअर्जुन खोतकर