शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फेरफार दाखल्यासाठी तहसीलचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:35 IST

पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात येत आहे.सध्या शेतक-यांना पीककर्ज घेण्यासाठी बँकानी फेरफार नक्कल आवश्यक आहे. ते मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी नक्कल घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत. काही वेळेस गर्दीमुळे गोंधळ उडत आहेत. शिवाय काही दलालानी नक्कल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला परिणामी शेतक-यांना वेळेत नकल मिळने अवघड झाले होते. पैसे दिल्याशिवाय कर्मचारी फेरफारची नकलच देत नसल्याने शेतक-यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या आदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले होते. याबाबत लोकमतने शेतकºयांच्या गैरसोयीबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्याकडे सुध्दा शेतक-यांनी तक्रारी केल्या. याची दखल घेत गवळी यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत सूचना केल्या होत्या. यामुळे तहसील प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार कोल्हे यांनी सर्वच कर्मचा-यांना शेतक-यांना फेरफार दाखल देण्याच्या कामाला लावले. स्वत: अभिलेख कार्यालयात हजर राहून शेतक-यांना दाखल्याचे वाटप केले. सध्या फेरफार दाखल्यासाठी तहसील कार्यालयात शेतक-यांची गर्दी होत आहे. शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वच कर्मचा-यांना सूचना दिलेल्या आहेत. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना