शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींवर मात करण्याची शिकवण कामी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:02 IST

अडचणींवर मात करण्यासाठी शिकवण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी शासकीय सेवेत रुजू होऊ शकलो, असे बदनापूर येथील तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.

बदनापूर : शेगाव येथील कन्या शाळेतील शिक्षिका कुमोद सराफ भेटल्या आणि माझी शिक्षणातील गोडी वाढली. मला गणित विषयाची आवड नव्हती. त्यामुळे ४ थीच्या स्कॉलरशिपमध्ये कमी मार्क मिळाले. मात्र, शिक्षिका सराफ यांनी गणित विषय चांगल्या पध्दतीने शिकविला. त्यामुळे ७ वीमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची आवड निर्माण झाली. अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी शासकीय सेवेत रुजू होऊ शकलो, असे बदनापूर येथील तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.डीएड् केल्यानंतर औरंगाबाद येथील ज्योती विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळाली. नोकरी करीत असताना एक्सर्टनल बीएड केले. पुढे शिकण्याची आवड होती. मात्र, नोकरी, घर संभाळून यश मिळेल का ? हा विचार सतत येत होता. मात्र क्लासेस जॉईन केल्यानंतर मोहन घाडगे या शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याने प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला व जोमाने परीक्षेची तयारी केली. मला येणाऱ्या अडचणी घाडगे सर सोडवायचे. मला नेहमी अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. त्यामुळे सन २००४ मध्ये मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम नायब तहसीलदार झाले व आज तहसीलदार म्हणून काम करीत आहे.वडिलांची नोकरी आणि बदलीमुळे नवीन गाववडील शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांची सतत बदली होत होती. त्यामुळे माझ्या शाळा अनेकवेळा बदलल्या. शाळा बदलत असल्या तरी वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करणारे शिक्षक मिळाले. या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात यशस्वी होता आले. आजच्या युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश नक्की मिळते.इयत्ता ५ वीत असताना वडिलांची बदली शेगाव येथे झाली. त्यामुळे मला कन्या शाळेत पाचवीमध्ये प्रवेश घ्यावा लागला. मात्र, शाळेत मी नवीन असल्यामुळे कुणीही ओळखीचे नव्हते. त्यामुळे मला शाळेत काही विचारण्याची भिती वाटत होती. तेथे मला कुमोद सराफ या शिक्षिका भेटल्या. त्यांनी माझी वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ओळख करून दिली. त्यामुळे अनेक मैत्रिणी मिळाल्या. खेळताना, जेवताना या मुली माझ्यासोबत राहू लागल्या. सराफ व इतर सर्वच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाची यशस्वी वाटचाल झाली आहे.तयारीदरम्यान उच्चशिक्षितांशी झाली स्पर्धानोकरी करीत असताना क्लास जॉईन केला. मात्र, या क्लासमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी डॉक्टर, इंजिनिअरसह इतर उच्चशिक्षित विद्यार्थी येत होते. या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करता येईल का ? हा विचार काही काळ आला. मात्र, शिक्षक मोहन घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळे अडचणींवर मात करता आली. अभ्यासातील सातत्य आणि यश मिळविण्याचा केलेला संकल्प यामुळे आपण यशस्वी झालो.

टॅग्स :TahasildarतहसीलदारTeachers Dayशिक्षक दिन