शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

८ ‘चेकपोस्ट’वर पोलीस करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:52 IST

जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ सुरू केले जाणार आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ सुरू केले जाणार आहेत. तर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘नाकाबंदी’ ९कली जाणार असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.निवडणुका म्हटलं की साम, दाम, दंड, भेद आदी तत्त्वांचा वापर करून राजकीय पुढारी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र धडपड करीत असतात. त्यात अर्थकारणालाही अधिक महत्त्व येते. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत पैशांचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ तयार केले जाणार आहेत. शिवाय शहरी, ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘नाकाबंदी’ केली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी पोलीस अधिकारी, कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार असून, छायाचित्रीकरणात वाहनांची तपासणी केली जाणार आहे.या वाहनांमध्ये पैसे, हत्यारे किंवा इतर अवैध साहित्य आढळून आले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.निवडणूक कालावधीत निवडणूक विभागाकडूनही विविध पथके नियुक्त केली जातात. अशा पथकांमध्येही मागणीनुसार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत केले जाणार आहेत. विशेषत: ठाणेस्तरावरील रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात वाढीव पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. नागरिकांनीही आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गुन्हेगारांवर नजरआदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. आजवर एमपीडीए अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती ठाणेस्तरावरून मागविण्यात आली आहे. या माहितीनंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक व इतर प्रकारच्या कारवाया केल्या जाणार आहेत. याशिवाय ठाणे प्रभारींनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच ठाणे प्रमुखांची बैठकही पोलीस अधीक्षक घेणार आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीस