शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे बनावट कार्यालय थाटून ४८ लाखांना फसविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 20:16 IST

वनविभागात विविध पदावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून सात बेरोजगारांकडून ४८ लाख ५० हजार रुपये उकळून त्यांना बनावट नोकरीचे आदेश देऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.

जालना - वनविभागात विविध पदावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून सात बेरोजगारांकडून ४८ लाख ५० हजार रुपये उकळून त्यांना बनावट नोकरीचे आदेश देऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका महिलेचा समावेश आहे.

या संदर्भात येथील समर्थनगर भागात राहणारे देविदास राणुजी वाघमारे (५५) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित शुभम दिनेशसिंग राजूपत, बलदेवसिंग रामसिंग राजपूत, डी.बी. राजपूत (रा. साखरर्खेडा) पवन राजेंद्र लोंढे (रा. सिंदखेडराजा), राजकुमार बी. वाघमारे (रा. डिग्रस, ता. सिंदखेडराजा) विवेक धनवे (रा. चिखली, ता. बुलडाणा) यांच्यासह अन्य दोघांचा समावेश असून, पैकी एक महिला आहे.

संशयितांनी संगनमत करून  फिर्यादीच्या नातेवाइकासह अन्य सहा जणांना वनविभागात विविध पदांवर नोकरी देण्याचे अमिष दाखविले. यासाठी त्यांच्याकडून २०१६-१७ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना आरटीजीएसद्वारे तब्बल ४८ लाख ५० हजार  रुपये घेतले. वनविभागात नोकरी दिल्याचे  भासविण्यासाठी चिखली येथे घर भाड्याने घेऊन तिथेच वनविभागाचे कार्यालय थाटले. एवढ्यावरच न थांबता सात जणांना बनावट नियुक्तीपत्र तयार करून, ते खरे असल्याचे भासवत राजकुमार वाघमारे या तरुणाला वनअधिकारी म्हणून नोकरीवर रूजू करून घेतले.

मात्र, दोन-तीन महिने उलटूनही पगार न झाल्यामुळे, तुमच्या पदाला मान्यता येताच पदार निघेल असे सांगून सतत दिशाभूल केली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  संशयितांवर शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.