शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विधिसेवा सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:55 IST

दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असून, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून, आजपासून गरीबासाठी हे विधिसेवा प्राधिकरणा मार्फत विधिसेवा केंद्र सुरु करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश विरेश्वर यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असून, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून, आजपासून गरीबासाठी हे विधिसेवा प्राधिकरणा मार्फत विधिसेवा केंद्र सुरु करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश विरेश्वर यांनी दिली.या सल्ला (देखरेख) केंद्राचा गरिबांबरोबरच सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहनही त्यांनी या वेळी केले. जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, आणि अल अजमत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जुना जालना भागातील मुजाहेद चौक येथे कायदे विषयक ग्राम देखरेख केंद्राचे उद्घाटन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन. व्ही. विरेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिसेवा प्राधिकरण विभागाचे अधीक्षक खुर्साले, अ‍ॅड. जे. एस. भुतेकर, सुनील सोनी, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, माजी नगरसेवक अय्युब खान हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचे अ‍ॅड. अर्शद बागवान यांनी स्वागत केले.कार्यक्रमात पुढे बोलताना विरेश्वर म्हणाले की, १० डिसेंबर हा मानव दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि याच दिवसापासून गरिबांना मार्गदर्शन करण्यासाठी विधि सेवा प्राधिकरण हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. गोरगरिबांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन यांनीही विचार मांडले. यावेळी उस्मान मोमीन, शेख मुसा, सय्यद करीम, जावेद तांबोली, बडे खान, मजहर खान, बजरंग कांबळे, अमजद बागवान, सोहेल खान, अन्वर बागवान आदींची उपसिथती होती. या केंद्रातून गरिबांना मोफत विधिसल्ला मिळू शकतो. त्याचा लाभ घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSocialसामाजिक