शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात दुपारीच शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:10 IST

तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना; पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. शाळा महाविद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामुळे उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखल, आदीसह कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी, पालकवर्गाची रेलचेल वाढली आहे. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दुपारचे साडेतीन वाजले तरी कार्यालयात गैरहजर होते. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शासकीय कार्यालयात येणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कर्मचा-याची दुपारची जेवणाची वेळ अर्धातास केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याची सर्वशी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची असणार आहे. मात्र जुन्या सवयीनुसार कर्मचारी तासनतास कार्यालयातून गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कार्यालयीन प्रमुखाचे असेल, असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र येथील तहसील कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे शासकीय कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यालयातून तासन्तास गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकार