शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न

By विजय मुंडे  | Updated: July 19, 2023 16:00 IST

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम

- फकिरा देशमुखभोकरदन (जि.जालना) : ११ एकरात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड करून एका शेतकरी कुटुंबाने तीन महिन्यांत तब्बल ५५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन महिने ही मिरची विक्री होणार असून, मिरचीला असाच भाव राहिला तर उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. तिखट मिरचीचा 'गोडवा' चाखण्याची किमया धावडा (ता.भोकरदन) येथील शेतकरी कुटुंबाने साधली आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. यावर्षी ५ हजार हेक्टरमध्ये मिरची लागवड झाली आहे. धावडा येथील शेतकरी एकबालखाँ अक्रमखाँ पठाण, खालेदखाँ पठाण या भावंडांनी ११ एकरमध्ये १३ ते ३० एप्रिल या कालावधीत गादीवाफे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पाणी देऊन सिमला, पिकाडोर, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची चार बाय सव्वा अंतरावर ठिबक नळीच्या दोन्ही बाजूने लागवड केली. या लागवडीसाठी पठाण कुटुंबाला १० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे केलेला खर्च निघतो की नाही याची भीती या कुटुंबाला होती;

परंतु एकबालखाँ पठाण यांनी न डगमगता मिरची पिकावर औषधी, खते, फवारणी केली. शेवटी मिरचीसाठी पाणी कमी पडू लागले तेव्हा टँकरने पाणी विकत घेऊन मिरची जोपासली. जूनमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना ११ हजार, १० हजार, ९ हजार असा भाव मिळाला. तर सिमला मिरचीला ४ हजार ५०० व पिकडोरला सुद्धा ४ हजारांचा भाव मिळाला. त्यामुळे आजवर त्यांना ५५ लाख ३० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. यापुढील काळात असाच भाव राहिला तर त्यांचे उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. शिवाय दोन महिन्यांनंतर त्यांना लाल मिरचीचे उत्पन्न मिळणार आहे.

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्नआम्ही किराणा व्यावसायिक असलो तरी शेती कसण्याची आवड आम्ही जोपासली आहे. यातूनच यंदा ११ एकर शेतात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कष्टामुळे सध्या चांगले उत्पन्न मिळत आहे. आजवर ८ तोडे झाले असून, त्यासाठी ४० महिला मजूर दररोज शेतात कामाला येतात. शिवाय १० सालदार आहेत. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.- एकबालखाँ पठाण, शेतकरी धावडा

टॅग्स :FarmerशेतकरीCropपीकJalanaजालना