जालना : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मंगळवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांमध्ये मान्यवरांनी प्रतिमापूजन करून महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित माहिती दिली.
फोटो आहे
अंतरवाली सराटी येथे कार्यक्रम
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष बाबाराजे तारख, सरपंच देविदास डोंगरे, अनिल तारख, विशाल झांजे, श्रीकांत घाडगे, अशोक शेंडगे, विकास गाडगे, निखिल जाधव, सद्दाम शेख यांची उपस्थिती होती.
------------
फोटो आहे
लालबहादूर शास्त्री विद्यालय
परतूर : शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात मुख्याध्यापक वसंत सवने, उपमुख्याध्यापक एस. के. वायाळ यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी आर. टी. राऊत, जी. डी. शिंदे, संदीप वाघमारे, बालाजी ढोबळे, सचिन खरात, व्ही. एस. तनपुरे, टी. जी. घुगे, वैजनाथ तनपुरे, विष्णू कुंभेफळ, दिनकर टकले, निवृत्ती कातारे, उद्धव ठाकरे, आदींची उपस्थिती होती.
................................
गंज शाळेत कार्यक्रम
परतूर : शहरातील गंज प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाला केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मुख्याध्यापक विष्णुपंत तोटे, आदींची उपस्थिती होती. तसेच शहरातील स्व. बाबासाहेब आकात नागरी पतसंस्थेतही प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन विजय राखे, मॅनेजर शिवाजी ढगे, विठ्ठल बरकुले, परमेश्वर पवार, आदींची उपस्थिती होती.
-------------
साई केंब्रिज स्कूल, वालसावंगी
वालसावंगी : येथील साई केंब्रिज इंग्लिश स्कूल व साई केंब्रिज मराठी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयात मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष किरणकुमार भुते, उपाध्यक्ष कमलाबाई भुते, सचिव कपिल भुते, मुख्याध्यापक दीपाली भुते, आदींची उपस्थिती होती.
----------
अण्णासाहेब देशमुख महाविद्यालय
पिंपळगाव रेणुकाई : येथील कै. अण्णासाहेब देशमुख महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष ए. व्ही. देशमुख, संस्थेचे संचालक बी. जी. गाढे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी प्राचार्य जी. पी. पांडे, प्राचार्य व्ही. आर. देशमुख, प्राचार्य आर. आर. सोनुने, कार्यालयीन अधीक्षक डी. ए. देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. जी. सदाशिवे, प्रा. एस. टी. लोखंडे, व्ही. बी. देशमुख, आर. डी. खराटे, व्ही. जी. देशमुख, एस. ए. धायडे, गजानन पंडित, आदींची उपस्थिती होती.
------------
गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूल
जालना : तालुक्यातील गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष भाऊसाहेब गोरे व सचिव रत्नमाला गोरे यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी प्राचार्या अनिता शिंगणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
----------
फोटो आहे
जीवनराव पारे विद्यालय
चंदनझिरा : येथील जीवनराव पारे विद्यालयात शिक्षक ओमप्रकाश एखंडे व प्रमोद बुनगे यांनी प्रतिमापूजन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुभाष पारे, माधव भद्रे, नारायण राजेभोसले, हरिश्चंद्र ढगे, शरद गायकवाड, अमोल जाधव, दीपक मोटरकर, पवन मुळे, आदींची उपस्थिती होती.
-------------
फोटो आहे
जनता विद्यालय, पारध
पारध : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. यावेळी प्राचार्य एस. एस. खोडके, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे, प्रा. एस. डी. हिवाळे, प्रा. एन. एन. पाटील, आर. के. वानखेडे, प्रा. संग्राम देशमुख, प्रा. एस. एस. गडदे, एस. डी. बोर्डे, प्रा. विनोद सोनगिरे, प्रीतमसिंग मोरे, विजया इंगळे, मृदुला काळे, लता वाकोडे, आदींची उपस्थिती होती.
-------
नगरपरिषद कार्यालय, भोकरदन
भोकरदन : येथील नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष मंजूषा देशमुख यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, नगरसेविका गयाबाई जाधव, माजी नगरसेविका रेखा दारूंडे, विकास जाधव, रमेश जाधव, सोपान सपकाळ, पंजाब देशमुख, दिलीप देशमुख, आदींची उपस्थिती होती.
-----------
फोटो आहे
गुरुदेव विद्यामंदिर, वडीगोद्री
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर या शाळेत मान्यवरांनी प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका जे. डब्ल्यू. दांडगे, ए. एम. साळुंखे, जी. आर. गावडे, आर. व्ही. छल्लारे, ए. जी. खांडेभराड, डी. एन. खिल्लारे, सी. सी. पिंपरे, के. के. इरलवाड, प्रशांत कदम, रमेश दोंदल, जे. जे. साबळे, आदींची उपस्थिती होती.
---------
फोटो आहे
जिल्हा परिषद शाळा, हेलस
मंठा : तालुक्यातील हेलस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमापूजन केले. मुख्याध्यापक रमेश कुडे यांनी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी कार्यकर्ती शालिनी वाव्हळ यांनी गौतम वाव्हळ रचित माँ जिजाऊंचा पोवाडा सादर केला. यावेळी अनंत वाढेकर, परशराम टकले, अंगणवाडी सेविका शालन उंडे, शारदा प्रधान, शांताबाई वाघमारे, आशामती दहिभाते, सीमा खराबे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विठ्ठल खराबे, महेश खराबे, रामराजे खराबे, आकाश खेत्रे, नामदेव बनसोडे, तुकाराम खराबे, गणेश खराबे, यशोदा खराबे, शारदा खराबे, सुनीता खराबे, आदींची उपस्थिती होती.