शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित अधिकारी दीड महिन्यात पूर्वपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:07 IST

परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजूर प्रकरणात निकष डावलून विहिरींच्या प्रस्तावाला मंजूरी देणारे परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सिंचन विहीर मंजुरीच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेत मोठा गोंधळ उडाला होता. यावरून सर्वसाधारण सभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वादळी चर्चा करून सिंचन विहिरींचे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. सदस्यांचा रोष लक्षात घेऊन तसेच कागदपत्रांची छाननी करून तांगडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. एक हजार १९६ विहिरींपैकी ३०२ विहिरींच्या प्रकरणात निकष डावलल्याचे पुढे आले होते असे जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. हे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले होते.दरम्यान आर.एल. तांगडे हे मुळचे कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडे परतूरच्या गटविकास विभागाचा अतिरिक्त पदभार दिला असताना निकष डावलून सिंचन विहिरींना मान्यता देण्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन तसा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला होता.नंतर २७ एप्रिल रोजी प्राप्त पत्रानुसार निलंबित तांगडे यांना पुन्हा सेवेत घेऊन त्यांच्याकडे बदनापूर येथील गटविकास अधिका-याचा पदभार देण्यात आला आहे. हे पत्र देखील जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या स्वाक्षरीने निघालेले आहे.

टॅग्स :suspensionनिलंबनJalna z pजालना जिल्हा परिषद