शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांअभावी शस्त्रक्रिया लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:29 IST

जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत. त्यांची आवश्यक असणारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी जेवण तसेच अन्य काही पदार्थ न खाण्याचा सल्ला या महिलांना देण्यात आल्याने दोन दिवसांपासून आम्ही जेवणही केले नसल्याचे महिलांनी सांगितले.या जिल्हा रूग्णालयातील प्रकारा संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांना विचारले असता, आपण बैठकीत असून, नंतर बोलतो असे सांगितले.जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रारंभी गाव पातळीवर आरोग्य शिबीर घेऊन महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी राजी करण्यात आले होते. त्यांना मंगळवारीच जालन्यातील जिल्हा रूग्णालयात बोलावण्यात आले. त्यांची मंगळवारीच शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. तसेच त्यांना जिल्हा रूग्णालयातील एका हॉलमध्ये विश्राम करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसांपासून या महिला येथे थांबल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.एकीकडे जालन्यात ४० कोटी रूपये खर्च करून महिला व बाल रूग्णालय उभारले आहे. असे असताना या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांना जिल्हा सामान्य रूग्णालयात का पाठवले असा सवाल केला जात आहे. त्यातच दोन दिवसांपासून महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी का आले नाहीत, की तसेच नियोजन असून ते डॉक्टर गैरहजर राहिले का, असेही विचारले जात आहे.या शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले आहे. ते उद्दिष्ट हे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते,या शस्त्रक्रियेस राजी झालेल्या महिलांनाही थोडीबहूत आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. वैद्यकीय अधिकारी न आल्यानेच या शस्त्रक्रिया लांबल्याचे बोलले जाते.उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर मिळतात अनेक लाभडॉक्टरांनाही या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास त्यांना वेतनवाढीसह त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच प्रत्येक जिल्ह्याला यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने तो खर्च करणेही अनिवार्य असते.महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचे महत्व पटवून देण्यासह लोकसंख्या वाढीचे दुष्परिणामही समजावून सांगावे लागत असल्याने हे मोठे जिकिरीचे काम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय