शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आठ स्टील उद्योगांना समन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:07 IST

सोमवारी जालन्यातील जवळपास आठ बड्या स्टील उत्पादकांच्या संचालकांना समन्स बजावण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील स्टील उद्योजकांनी मागील काही वर्षात वीज वापर जास्त आणि त्या तुलनेने उत्पादन कमी दाखवल्याचे केंद्रीय उत्पादन शुल्कने केलेल्या पाहणीतून पुढे आले होते. या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात सोमवारी जालन्यातील जवळपास आठ बड्या स्टील उत्पादकांच्या संचालकांना समन्स बजावण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.२००३ ते २००८ या कलावधीतील या आठ स्टील कंपन्यांनी त्यांचे मूळ उत्पादन दडवून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप या उद्योजकांवर ठेवण्यात आला होता. यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने त्या काळात कानपूर येथील आयआयटीच्या एका तज्ज्ञ समितीकडून एक टन स्टीलचे उत्पादन करण्यासाठी किती युनिट वीज लागले याचा तपशील जाणून घेतला. त्यानुसार या आठ उद्योजकांनी जो विजेचा वापर केला आहे, त्या तुलनेत जेवढे उत्पादन निघणे अपेक्षित होते, ते न दर्शविता बऱ्याच अंशी कमी दाखवून कर चुकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या उद्योजकांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सोमवारी जालना येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता, न्यायालयाने सर्व संबंधितांना समन्स बजावले असून, पुढील तारखेस आपले म्हणणे मांडण्याचे सांगितले आहे. या प्रकरणी आता नव्याने नियुक्त झालेले जीएसटी विभागाचे विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दीपक बी. नाईक यांनी या प्रकरणी केंद्र सरकारकडून बाजू मांडली. दरम्यान या संदर्भात येथील स्टील उद्योजकांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ते म्हणाले की, आयआयटीने जो तपशील दिला आहे, तो एका अंदाजावर आधारित दिला आहे. त्यामूळे उत्पादन करतांना अनेक अडचणी असतात, तंतोतंत जेवढी वीज वापरली तेवढे उत्पादन येथे शक्य नसल्याचे नमूद केले. यापूर्वी देखील आम्ही ग्राहक न्यायालयात दोन प्रकरणांमध्ये जिंकलो आहोत.दंडाची रक्कम ५८ कोटी रूपयांपेक्षा जास्तआज घडीला ज्या आठ स्टील उद्योजकांना जे समन्स बजावले आहेत, त्यातील दंडाची एकूण रक्कम ही ५८ कोटी ६४ लाख रूपये होतात. यात आणखी जवळपास सहा कंपन्यांवरील कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे ती दंडाची रक्कम कळू शकली नाही.मध्यंतरी या प्रकरणी येथील स्टील उद्योजकांनी या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या दंड आकरणी विरूध्द नाशिक येथील ट्रिब्युनलमध्ये आव्हान देऊन दंडाची रक्कम कमी करून घेतली होती, हे विशेष.

टॅग्स :MIDCएमआयडीसीCourtन्यायालयelectricityवीज