शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

 एकाची मोती तलावात आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:42 IST

शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी मोतीतलावातील पाण्यात तरंगताना आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव डोळझाके (४७) असून ते शहरातील देहेडकरवाडी परिसरातील रहिवासी होते.

जालना : शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह रविवारी सकाळी मोतीतलावातील पाण्यात तरंगताना आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबूराव डोळझाके (४७) असून ते शहरातील देहेडकरवाडी परिसरातील रहिवासी होते.पोलीस सूत्रांनी सांगितले, की सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोती तलाव चौपाटीवर भेळपुरीची गाडी लावणारे मनोज वाघमारे यांना तलावात असणा-या विहिरीलगत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. वाघमारे यांनी याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरीक्षक योगेश गावडे, सहायक निरीक्षक परजने, एम.एन. घोडे व अन्य कर्मचा-यांनी अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.दरम्यान, ही माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक ग्रुपवर शेअर झाली. दुपारी काही जणांनी चंदनझिरा पोलिसांशी संपर्क साधून मृताची ओळख पटविली. डोळझाके यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा ते घरातून निघून जायचे. गत काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहायक उपनिरीक्षक एम.एन.घाडे तपास करीत आहेत.