शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही -जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:13 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आ. जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षभरापूर्वीपासून पेटला आहे. आधी लोकशाही मार्गाने मूक मोर्चे काढले त्याचा परिणाम झाला नाही. त्या नंतर आता ठोक मोर्चे, चक्का जाम, ठ्यिा आंदोलन, मुंडण आंदोलन आदी आंदोलनातून राज्य सरकारकडे आम्ही आरक्षणासाठी मागणी करत आहोत. मात्र शासनाकडून केवळ चुकीचे मुद्दे उपस्थित करून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही आ. जाधव यांनी केला. आज सर्व पक्षात मराठा समाजाचे नेत आहेत, परंतु ते एकत्र नाहीत. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करत आहे. मराठा समाजाने त्यांचा दबावगट तयार केल्यास आरक्षणाची लढाई सोपी होऊ शकते, मात्र समाज एकत्र येण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढून त्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावून त्यावर मंथन करण्याची गरज आहे. आज अनेकजण भावनिक होऊन आपले जीवन आत्महत्या करून संपवत असल्याने त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. आपला समाज हा रडणारा नाही तर लढणारा समाज आहे. त्यामुळे खचून न जाता हिंमतीने तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी संजय लाखे पाटील यांनी सांगितले की, मराठा आंदोलनात मुंडण आंदोलन करून एक विक्रम केला आहे. त्याची नोंद लवकरच लिम्का बुकमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगून येत्या काही दिवसात आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच प्रशांत वाढेकर यांनी औरंगाबादेतील अंबादास दानवे यांनी ज्या तरूणाला लाथा मारल्या तो तरूण जालना जिल्ह्यातील आहे, त्याचे चित्रीकरण पाहून आम्ही अंबादास दानवे विरोधात आयुक्तां कडे तक्रार करणार असल्याचेही वाढेकर म्हणाले. पत्रकार परिषदेस राजेश राऊत, विष्णू पाचफुले, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, कृष्णा पडूळ आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव