टेंभुर्णी : ग्रामीण भागात सध्या आधुनिक पद्धतीने क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत. अशा स्पर्धांतून खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळत असते. त्यामुळे ग्रामीण भागात अशा स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे मत डावरगाव देवीचे सरपंच अनिल नवले यांनी व्यक्त केले. जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथे आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बुधवारी बोलत होते.
या स्पर्धेत डावरगाव देवीसह परिसरातील उत्कृष्ट संघांनी सहभाग नोंदविल्याने ही स्पर्धा रोमांचक होत आहे. या स्पर्धेचे मैन ऑफ दी मॅच, मैन ऑफ दी सीरिज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, ऑलराउंडर प्लेअर आदी बक्षिसे ठेवण्यात आल्याने या स्पर्धेत अनेक अष्टपैलू खेळाडू सहभाग घेत आहेत. यावेळी गावतील क्रीडाप्रेमी नागरिकांसह खेळाडूंंची विशेष उपस्थिती होती.
फोटो- डावरगाव देवी येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करताना सरपंच अनिल नवले व इतर.