शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

३७७ परवानाधारकांची शस्त्रे पोलिसांकडे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजवर जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.जिल्ह्यातील ५७४ जणांनी स्वसंरक्षणासह इतर कारणांनी शासकीय नियमानुसार परवाने घेऊन शस्त्रे घेतली आहेत. या शस्त्रधारकांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शस्त्रे जमा करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत ही शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत परवानाधारकांनी शस्त्र वाहून नेण्यावर, बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजवर जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस दलाकडे जमा केली आहेत.शासकीय कर्तव्य पार पाडणा-या दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी, कर्मचारी व सराफा यांचे व्यतिरिक्त तसेच उच्च न्यायालयीन रिट पिटीशन क्र. ४११७/२०१४/ ४२४३/ २०१४ मधील आदेशास आधीन राहून संबंधितांना सूट देण्यात आली आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकCode of conductआचारसंहिता