शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबड येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:31 IST

पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. कपिल प्रतापराव शिंदे (२४, रा.परभणी ह.मु. शिवनगर अंबड ) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.याबाबत ठाणे अमलदार भारकड यांनी सांगितले की, परभणी येथील राहणारा मयत कपिल शिंदे हा शहरातील शिवनगर येथील अश्विनी विष्णू वाघ यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन राहत होता. तो शहरातील पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सिव्हील डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याने त्याच्या किरायाच्या राहत्या घरातील फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैय्या, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, अरक शेळके, जमादार बरडे, पोलीस नाईक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.त्यानंतर कपिल शिंदे याचे प्रेत शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या प्रेतावर शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे प्रेत पुढील अंतविधी कामी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कपिल प्रतापराव शिंदे याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही स्पष्ठ झाले नाही.याप्रकरणी पृथ्वीराज जगदीश मोरे (२१, रा. इनकम टँक्स कॉलनी ता.जि.जालना ) याच्या माहितीवरुन अंबड पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक देशमुख हे करीत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.शनिवारी मित्रांनी केला वाढदिवस साजरादरम्यान, कपिलचा शनिवारी वाढदिवस होता. सायंकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कपिलने का आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक बलैय्या, पोउपनि. सुग्रीव चाटे यांनी भेट दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी