जालना : जाफराबाद तालुक्यातील पोखरी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती सपोनि पायघन यांना मिळाली. या माहितीवरून सदर ठिकाणी जाऊन मुलगा व मुलीच्या आई-वडिलांना बालविवाहाचे परिणाम सांगितले. सदर विवाह होणार नाही, याबाबत लेखी नोटीस अदा करून समज देऊन पोलिसांनी बालविवाह रोखला. यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि पायघन, उपनिरीक्षक साखळे, कर्मचारी मोहिते, घोंडगे, जावळे, भुतेकर आदींची उपस्थिती होती.
गोद्री येथे दोन मुली बेपत्ता
भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व फिर्यादीची पत्नी शनिवारी दुपारी शेतात गेले होते. फिर्यादीच्या बहिणीची मुलगी व फिर्यादीची मुलगी घरी होत्या. शेतातून घरी आल्यावर दोन्ही मुली घरात दिसल्या नाहीत. त्यांचा शोध घेतला असता, त्या मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.